Belagavi

शिवप्रेमींच्या अपूर्व उत्साहात बेळगावात पार पडली चित्ररथ मिरवणूक

Share

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बेळगावात शिवप्रेमींच्या उत्साहात ऐतिहासिक चित्ररथ मिरवणूक पार पडली. महाराजांच्या पराक्रमाचे दर्शन घडवणारे सजीव चित्ररथ, गडकोट, तलवारबाजी, ढोल-ताशे आणि विविध पारंपरिक कलांचा संगम यामुळे मिरवणुकीने शिवसृष्टीचं दर्शन घडवलं.

बेळगावात १०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या शिवजयंती उत्सवात यंदाही शिवप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ, पोलीस विभाग, बेळगाव महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, नगरसेवक, आजी माजी लोकप्रतिनिधी, विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतीत पारंपरिक पालखी पूजनाने चित्ररथ मिरवणुकीचा शुभारंभ नरगुंदकर भावे चौकात पार पडल्यानंतर मारुती गल्ली, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, जत्तीमठ, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमुकलानि चौक मार्गे कपिलेश्वर उड्डाणपुलावरून कपिलेश्वर मंदिराकडे येऊन मिरवणुकीची सांगता झाली.

अनेक सामाजिक, सांस्कृतिक मंडळांनी साकारलेले १०० हून अधिक सजीव चित्ररथ, ढोल-ताशा, लाठीमेळ्यासहित मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शिवकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिकं, तसेच छत्रपतींच्या जीवनप्रवासावर आधारित सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे, महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यांनी रात्री उशिरापर्यंत जागून मिरवणुकीचा आनंद घेतला.

शहरातील विविध जाती-धर्मांतील नागरिकांनी एकत्र येत ही परंपरा भव्यतेने साजरी केली, हे विशेष.

Tags: