Belagavi

अपघातातील युवकास खासदार शेट्टर यांनी दाखल केलं रुग्णालयात

Share

बेळगावमधील अनिगोळ या गावात दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दोघांना खासदार जगदीश शेट्टर यांनी स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात नेत माणुसकीचे दर्शन घडविले.

बेळगाव जिल्ह्यामधील बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ गावात बुधवारी एक भीषण अपघात घडला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातस्थळाजवळून माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांच्या वाहनांचा ताफा जात होता. त्या वेळी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी युवकाला पाहून, शेट्टर यांनी कोणतीही औपचारिकता न करता तातडीने आपल्या वाहनातून त्याला बैलहोंगलच्या सरकारी रुग्णालयात हलवले.

जखमींची नावे बसवराज रागी (वय 48, नवलगुंद तालुका) आणि शांतवीर पाटील अशी आहेत. शेट्टर हे भाजप कार्यकर्त्याच्या लग्नासाठी प्रवास करत असताना ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. बैलहोंगल पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, शेट्टर यांच्या तत्परतेचे आणि माणुसकीच्या भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: