Dharwad

चालू दुचाकीत लागली आग; टळला मोठा अनर्थ… स्थानिकांनी पाण्याच्या टँकने आणली आग आटोक्यात

Share

धारवाड शहरात धावत्या दुचाकीला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना अंजनेयनगर परिसरात घडली असून, मोठा अपघात टळला.

धारवाडहून अळणावरच्या दिशेने जात असलेली दुचाकी तांत्रिक बिघाडामुळे अचानक पेटली. वाहनचालकाने प्रसंगावधान राखत दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून तत्काळ दूर जाऊन मदतीसाठी स्थानिकांकडे धाव घेतली.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी वेळ न दवडता जवळून जात असलेल्या पाण्याच्या टँकरला थांबवून त्यातील पाण्याचा वापर करत दुचाकीला लागलेली आग विझवली.

या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना धारवाड उपनगरीय पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, दुचाकीचालकाचे नाव व अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.

Tags: