Belagavi

‘गृहलक्ष्मी’ला मिळणार ‘मे’चा मुहूर्त! तिन्ही हप्ते होणार एकाच महिन्यात जमा… : मंत्री हेब्बाळकर

Share

राज्याच्या गृहलक्ष्मी योजनेंतर्गत मे महिन्यात तीन हप्त्याच्या निधीच्या वितरणाच्या घोषणेसोबतच, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकार परिषदेत विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत राज्याच्या गृहलक्ष्मी योजनेंतर्गत मे महिन्यात तीन हप्त्याच्या निधीच्या वितरणाची घोषणा केली. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या हप्त्याचे वितरण पुढील महिन्यात करण्यात येईल. महसूल विभागाने मंजुरी दिल्यानंतर, मे महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत निधीची वितरण प्रक्रिया पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या संविधान बचाव कार्यक्रमात घातलेल्या गोंधळावर टीका करताना त्या म्हणाल्या, लोकशाहीनुसार सर्वांना आपले मत व्यक्त करण्याचा हक्क आहे. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घातला हि बाब निंदनीय असल्याचे त्या म्हणाल्या. भाजप कार्यक्रमांच्या दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी असे केले असते, तर भाजप कार्यकर्ते शांत बसले असते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यावर हात उचलल्याच्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, मी ती कृती योग्य ठरवणार नाही. मात्र त्या क्षणी जी परिस्थिती होती, तीच त्यामागे कारणीभूत ठरली. सिद्धरामय्या कधीही अशा प्रकारे वागणारे नेते नाहीत. ते नेहमीच अधिकार्‍यांना सन्मान देणारे आहेत. ते वंचितांचं नेतृत्व करणारे, संवेदनशील आणि सुसंस्कृत नेते आहेत. काल जे घडलं, त्याला मी योग्य ठरवत नाही असे ते म्हणाले.

Tags: