शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मार्केट पोलिस ठाण्यात शिवजयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांंसोबत बैठक झाली.
मंडळांनी मिरवणुकीत केवळ पांरपारिक वाद्ये वाजवावी.डीजे वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसार मनाई आहे. सर्वांनी नियमांचे पालन करावे असे पोलिस सहआयुक्त सदाशिव कट्टीमणी यांनी शिवजयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.शिवजयंती चित्ररथ मिरवणूक गुरुवार 1 मे रोजी उत्साहात साजरा होणार आहे. पोलिस प्रशासनानेही डाॅल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, अशा सूचना दिल्या. बैठकीस यांची होती उपस्थिती शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव,रणजित पाटील शिवाजी मांडोळकर रोहन जाधव अनंत बामणे,मेघन अरुण पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments