Belagavi

दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र येणे गरजेचे – मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार जे कोणतेही कठोर निर्णय घेईल, त्याला आमच्या सरकारचा पूर्ण पाठिंबा राहील, असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.

आज बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या संकटकाळात राजकारण न करता सर्व पक्षांनी दहशतवाद्यांच्या विरोधात एकत्र यायला हवे. केंद्र सरकार दहशतवाद निर्मूलनासाठी जे निर्णय घेईल, त्या प्रत्येक निर्णयाला आमचे राज्य सरकार पाठीशी राहील, असेही त्यांनी नमूद केले. यासंदर्भात राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनीही हीच भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: