दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवण्याची मोहीम राबवण्यात आली असून, लायन्स क्लब आणि हुबळीच्या महावीर लॅब सेंटर यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
बेळगाव येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स हॉल मध्ये आयोजित कृत्रिम अवयव मोजणी शिबिरात एकूण १२० दिव्यांगांना नविन कृत्रिम अवयव बसवण्यात आले. हा उपक्रम ३.२ लाख रुपयांच्या खर्चात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन रवींद्र काकती यांनी स्वागत केले. क्लब अध्यक्ष लायन दया शहापूरकर यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. लायन्स जिल्हा गव्हर्नर लायन मनोज माणेक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जयभारत फाउंडेशन चे प्रमुख दाते आणि अशोक आयर्न वर्क्स युनिट III चे जनरल मॅनेजर (क्वालिटी) विनायक भोसले यांनी खाजगी क्षेत्राच्या सामाजिक भूमिकेवर भाष्य केले. लायन्स क्लब ऑफ बेळगावने अशोक आयर्न वर्क्सचे संचालक दयानंद कदम यांचा सन्मान केला.
या वेळी उपजिल्हा गव्हर्नर लायन विनोद जैन, सचिव लायन सतीश पाटील, तसेच लायन सदस्य प्रदीप मुतालिक, शीतल बोगर, प्रदीप सिद्दण्णावर, सतीश बाळेकुंद्री, भारती वडवी, उदय वडवी, प्रतिभा मुतालिक, लायन हेमंत कित्तूर, गीता कित्तूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments