Dharwad

धारवाड : विहिरीत बुडून शाळकरी मुलांचा मृत्यू

Share

धारवाड जिल्ह्यातील गामनगट्टी गावात बुधवारी दुपारी झालेल्या एका दुर्दैवी घटनेत दोन मुलांचा शेतातील विहिरीत डुबून मृत्यू झाला. मृतकांमध्ये जीवन मेदार (१०) आणि प्रविण लोकूर (१२) यांचा समावेश आहे.

धारवाड जिल्ह्यातील हुबळी तालुक्यातील गामनगट्टी गावात शेतातील विहिरीत जलतरण करण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. जीवन मेदार आणि प्रविण लोकूर, हे दोघेही आपल्या कुटुंबीयांना खेळायला जात असल्याचे सांगून शेतातील विहिरीत उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झळा.

मृत मुलांसमवेत आलेल्या इतर दोन मुलांनी घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. तातडीने घटनास्थळी कुटुंबीयांनी धाव घेतली. मात्र तोवर दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. हि बाब पोलिसांच्या निदर्शनात आणून देण्यात आली असून नवनगर एपीएमसी पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी किम्स हॉस्पिटलला पाठवले आहेत. याप्रकरणी नवनगर एपीएमसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tags: