कन्नड चित्रपट सृष्टीतील दिवंगत अभिनेते, ज्येष्ठ कलाकार डॉ. राजकुमार यांच्या ९७ व्या जन्मदिनी बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
कन्नड चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते आणि ज्येष्ठ कलाकार डॉ. राजकुमार यांच्या जन्मदिनानिमित्त वार्ताभवन येथे जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि माहिती व जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, कन्नड व संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालक विद्यावती भजंत्री, मंजुनाथ हुडेद, रामचंद्र कांबळे आणि शिरीष जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिरीष जोशी म्हणाले, की डॉ. राजकुमार हे केवळ महान कलाकारच नव्हे, तर लोकांनी त्यांना देवतासारखी वागणूक दिली. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने आणि व्यक्तिमत्त्वाने संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. मोहमद रोशन म्हणाले, डॉ. राजकुमार यांच्या प्रत्येक चित्रपटातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे. त्यांनी केलेली आरोग्यासंदर्भातील जागरूकता सर्वांसाठी एक उदाहरण आहे. त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि धैर्य सर्वांसाठी कौतुकास्पद आहे.
त्यानंतर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी डॉ. राजकुमार अभिनित चित्रपटातील गीत गायन करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी विविध मान्यवरांनी डॉ. राजकुमार यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments