गोव्यातून बेळगावकडे अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूचा साठा शहर गुन्हे शाखेच्या (शि.गु.शा.) पोलिसांनी जप्त केला आहे. गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली असून लाखो रुपये किमतीचा दारू साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
शहर गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एका खासगी वाहनातून गोव्यातून बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आणला जात असल्याचे निदर्शनास आले. याअनुषंगाने तपास यंत्रणांनी कारवाईची आखणी करून संशयित वाहनाला अडवले.
वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या. त्या सर्व बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या असून, जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून, जप्त दारूचा संपूर्ण तपशील व आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे. हे दारूचे साठे बेळगावातील विविध ठिकाणी वितरित करून काळ्या बाजारात विक्री करण्याचा उद्देश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


Recent Comments