Belagavi

बस्सापूरचे मुहम्मद इक्बाल बडेभाई यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार

Share

हुक्केरी तालुक्यातील बस्सापूर येथील उर्दू शाळेचे शिक्षक मुहम्मद इक्बाल बडेभाई यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे तालुक्यात अभिमान व्यक्त होत आहे.

हुक्केरी तालुक्यातील बस्सापूर येथील उर्दू उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मुहम्मद इक्बाल ए. बडेभाई यांना ‘कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघ’ यांच्यातर्फे राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बडेभाई यांनी लिहिलेल्या ‘आवो उर्दू सीखे’ या पुस्तकामुळे 13 एप्रिल रोजी दिल्लीतील गालिब अकादमी येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात त्यांना प्रशस्तीपत्र आणि सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते पार पडले. संघाचे अध्यक्ष वसीलअली गुर्जर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच वेळी कर्नाटक राज्य लिंग्विस्टिक मायनॉरिटी स्कूल वेल्फेअर संघाचे अध्यक्ष सलीम मुजावर यांनाही राष्ट्रीय उर्दू पुरस्कार देण्यात आला.

मुहम्मद इक्बाल बडेभाई हे मूळचे शहाबंदरचे रहिवासी असून सध्या काकती येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या वडिलांनीही शिक्षक म्हणून प्रामाणिक सेवा केली आहे. पारंपरिक शैक्षणिक वारसा जपत बडेभाई यांनी मिळवलेला हा राष्ट्रीय पुरस्कार बस्सापूर आणि शहबंदर परिसरासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

या प्रसंगी गौस मोमीन, सर्फराज मोमीन, शहानवाज कोतवाल, मन्सूर बडेभाई यांच्यासह अनेक शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: