बेळगाव शहरातील खंजर गल्ली परिसरातील लक्ष्मी मार्केट भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर हालचालींविरोधात महापालिकेने कारवाई केली आहे. मनपा पथकाने शेडवर धडक देत ते त्वरित हटवले आहे.
बेळगावच्या खंजर गल्लीतील लक्ष्मी मार्केट परिसरात एका शेडमध्ये बेकायदेशीर हालचाली सुरू असल्याची तक्रार काही नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त शुभा बी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता लक्ष्मी निप्पाणिकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या पथकाने सदर शेडवर धाड टाकली.
सदर शेडमध्ये अनेक दिवसांपासून संशयास्पद आणि बेकायदेशीर हालचाली सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिली होती. याची गंभीर दखल घेत महापालिकेने तत्काळ कारवाई करत शेड पूर्णतः हटवले असून, बेकायदेशीर कृत्यांना आळा घातला आहे.
महापालिकेच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, भविष्यात अशा अतिक्रमणाविरुद्ध सातत्याने कारवाई करण्याची मागणी होत आहे.


Recent Comments