Belagavi

एस.एस. मोबाईल्सची 295 वी शाखा आता बेळगावात…

Share

बेळगाव स्मार्ट सिटीमधील लोकांना नवीन स्मार्ट मोबाईलवर आकर्षक ऑफर्स देण्यासाठी एसएस मोबाईलने आता बेळगावात पाऊल ठेवले आहे.

महाराष्ट्रासह देशभरात विश्‍वासार्ह सेवा आणि ग्राहकांच्या प्रेमामुळे ओळख मिळवलेल्या एस.एस. मोबाईल्सची 295 वी शाखा आता बेळगावच्या कॉलेज रोडवर सुरू झाली आहे. येथे केवळ मोबाईलच नव्हे तर मोबाईल अ‍ॅक्सेसरीज, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट गिफ्ट्स आणि मोठ्या सवलतीही मिळणार आहेत.

या शोरूमच्या उदघाटनाचा कार्यक्रम बेळगावमधील आमदार, खासदार आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कॉलेज रोडवरील एस एस मोबाईल शाखेच्या उद्घाटनानिमित्त शहरात जनजागृती रॅलीही काढण्यात आली. एस.एस. मोबाईल्सची विश्वासार्हता जाणून बेळगावकरांनी पहिल्याच दिवशी मोबाईल आणि टीव्ही खरेदीसाठी मोठी गर्दी केली.

या शोरूममध्ये विविध मोबाईल्सवर एक्सक्लुझिव्ह 2 वर्षांची वॉरंटी, 4999 किमतीचे स्मार्ट गिफ्ट्स, 4000 पर्यंत कॅशबॅक, स्मार्टफोनवर 30% पर्यंत सवलत, नेकबँड, इअरबड्स, स्मार्टवॉचेससारख्या ब्रँडेड उपकरणांवर 75% पर्यंत सवलत, कोणतीही स्मार्ट टीव्ही घेतल्यास ५००० रुपये किमतीचा साउंड बार मोफत आपल्याला मिळणार आहे. महाराष्ट्रात विश्वासार्हतेसाठी प्रसिद्ध असलेले एस.एस. मोबाईल्स आता बेळगावातही आपल्या सेवांचा विस्तार करत आहे. ग्राहकांसाठी खास सवलतींचा वर्षाव करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

उद्घाटनाच्या निमित्ताने तब्बल पाच ऑफर्स दिल्या गेल्या असून, 75% पर्यंत सवलत दिली जात आहे. टीव्ही खरेदीवर साउंड बार फ्री दिला जातोय, या शोरूममधील ऑफरसंदर्भात असे एस.एस. मोबाईल्सचे स्टेट हेड प्रसाद जोशी यांनी अधिक माहिती दिली.

एस.एस. मोबाईल्सचे फायनान्स हेड दीनकर पाटील यांनी संस्थेच्या योजनांची आणि फायनान्स पद्धतींची सविस्तर माहिती दिली.

तर मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या –
एस.एस. मोबाईल्स, कॉलेज रोड, बेळगाव!

Tags: