बसवण कुडची येथील देवराज अर्स कॉलनीतील जैन समाजाकडून महावीर जयंती साजरी करण्यात आली.गुरुवार दि 10 रोजी सकाळी के एच बी कॉलनी येथील मारुती मंदिरापासून देवराज अर्स कॉलनी येथील गणपती मंदिर पर्यंत श्री भगवान महावीर 1008 महावीर तीर्थनकार यांची मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी भगवान महाविरांच्या फोटो ला हार घालून पूजा करण्यात आली.

त्यानंतर मिरवणूकीला सुरवात झाली.महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मिरवणूकिचे गल्लो गल्ली स्वागत करण्यात आले. व णमोकार महामंत्र म्हणन्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संजीव अक्की होते. यावेळी एम. टी. पाटील, नेमीनाथ चौगला,नूतन मजगावी, महावीर पाटील, पारिसनाथ करडी, हिराचंद कलमणी, दयानंद पाटील,बसवंत पाटील, येगप्पा नरसीगणावर, जयपाल चौगला, राजकुमार पाटील, बसवराज चौगले व देवराज अर्स कॉलनी आणि के एच बी कॉलनी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments