धारवाड येथे एका खासगी बसमध्ये प्रवासादरम्यान एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बस चालकाने महिलेला वाचवण्यासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत सदर महिलेचा मृत्यू झाला होता.

धारवाड सिंचन महामंडळात कार्यरत इंदुमती आर. कांबळे असे मृत महिलेचे नाव आहे. त्या धारवाड जयंती सर्कल येथून खासगी बसमध्ये प्रवास करत होत्या. टोल नाक्याजवळ पोहोचताच तिकीट तपासणीसाठी कंडक्टर त्यांच्याजवळ गेला. मात्र, त्या काहीही प्रतिसाद देत नव्हत्या. कंडक्टरने लगेच ही बाब बस चालकाला सांगितली. सहप्रवाशांनी महिलेला जागं करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चालकाने तातडीने बस जिल्हा रुग्णालयाकडे वळवली. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच महिलेला मृत घोषित करण्यात आले.
या घटनेचे दृश्य बसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. अचानक प्रवासादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने सहप्रवासी हादरले आहेत.
Recent Comments