Belagavi

बेळगावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी सोहळा

Share

उन्नती ट्रस्ट बेळगाव, राष्ट्र सेविका समिती बेळगाव आणि सामाजिक समरसता मंच बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री अहिल्याबाई होळकर यांचा त्रिशताब्दी सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संशोधक व लेखक शंकर एम बुचडी, अखिल भारत राष्ट्र सेविका समिती, पुणे येथील प्रचार व प्रसारण प्रमुख सुनिल हरी सोवनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवलिंगाचे पूजन व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व भारत माता प्रतिमा पूजनाने झाली.

अलकाताई इनामदार यांनी प्रास्ताविक केले. महापौर सविता कांबळे आणि शंकर गुरुजी पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकथेवर एक अप्रतिम लघुनाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात नंदेश कोरी, उज्वला बडवणचे, श्रीशैल मठपति, लक्ष्मी मिरजी आदी मान्यवर सहभागी झाले होते

Tags: