उत्तर कर्नाटकचे मंत्री सतीश जारकीहोळी मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आनंद होईल, असे खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले.

बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. विशेषत: उत्तर कर्नाटकातील मंत्री असलेले सतीश जारकीहोळी मुख्यमंत्री झाल्यास या भागाच्या समस्यांना अधिक प्रतिसाद देतील. सतीश जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्यातील असून त्यांना स्थानिक समस्यांची जाण आहे. मागासलेल्या खानापुर तालुक्याच्या समस्यांना ते उत्तर देतील. माझे आणि त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत . एखादे वेळेस ते मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल असे ते म्हणाले .

सतीश जारकीहोळी यांच्याशी माझा सुरुवातीपासून चांगला संबंध आहे. त्यांना काँग्रेस पक्षाच्या १३६ आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास आणि ते मुख्यमंत्रीपदावर आले तर बेळगाव जिल्ह्यातील एकजण मुख्यमंत्री होईल. या भागातील जनतेसाठी हा आनंदाचा क्षण असेल, असे ते म्हणाले.


Recent Comments