वनपरिक्षेत्राने व्यापलेल्या खानापूर तालुक्यात वारंवार वन्यप्राण्यांचे दर्शन होते. अलीकडे बिबट्यासह अनेक वन्यप्राण्यांचा वावर याठिकाणी वाढल्याचे दिसून येत असून पुन्हा गोधोळी तालुक्यात बिबट्याचे दर्शन घडल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.

खानापूर तालुक्यातील गोधोळी गावात आज पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने कुत्र्याची शिकार केली होती. त्यावेळी याठिकाणी बिबट्याचा वावर असल्याची खात्री पटली होती. मात्र आता गोधोळी गावात बिबट्या असल्याची खात्री एका व्हिडिओच्या माध्यमातून पटली असून बिबट्याचा वावर असणारा एक व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे. बिबट्याचा वावर या भागात असल्याने आता ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Recent Comments