03 ऑगस्ट 2024 रोजी बेळगाव जिल्ह्यातील अलतगा गावातील ओंकार अरुण पाटील वय 25 हा मार्कंडेय नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला होता . त्याचा मृतदेह बाहेर काढल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने एचइआरएफ फौंडेशनचे अध्यक्ष बसवराज हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली .

एचइआरएफ फौंडेशनचे अध्यक्ष बसवराज हिरेमठ व त्यांचे सदस्य सकाळी ७.०० वाजता घटनास्थळी हजर होते आणि अवघ्या एक तासात बेपत्ता मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आले.

HREF टीमने बचाव कार्याचे अप्रतिम प्रात्यक्षिक दाखवले आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल जिल्हा प्रशासन कृतज्ञ आहे आणि अशा हवामान आपत्तींमधून लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही जे कार्य पुढे नेले आहे त्यात तुम्हाला यश मिळावे अशी शुभेच्छा.असे पत्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे .
राजू टक्केकर, पद्मप्रसाद हुली, वैभव पाटील, संतोष दरेकर, राहुल पाटील, भरतेश लाटुकर, शैलेश पवार, परशेष पाटील, यल्लाप्पा कांबळे, गजानन पाटील, ओंकार चौगुले, अविनाश पाटील, मोहन गोंधळी, रितेश चौगले आणि आनंद पाटील यांनी देखील या शोधकार्यात सहकार्य केले


Recent Comments