ANIMAL

उगार येथील कृष्णा नदीपात्रात मगरीचे दर्शन

Share

उगार येथील कृष्णा नदीपात्रात मगरीचे दर्शन घडल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हि माहिती मिळताच आमदार राजू कागे व वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश अर्जुनवाड यांनी भेट दिली.

उगार गावातील रहिवासी खुदाबक्षीमुल्ला यांच्या शेताजवळ मगरीचे दर्शन घडले असून हि बाब तातडीने त्यांनी वनविभागाला कळविली. हि बाब समजताच नव्याने रुजू झालेले अथणी तालुका वनविभागाचे अधिकारी राकेश अर्जुनवाड यांनी भेट देऊन सर्व व्यवस्था केली.

गेल्या १८ दिवसांपासून कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक आणि खुर्द येथील पूल बुडाला होता. मात्र पावसाचा ओघ कमी झाल्याने पाण्याचा प्रवाह ओसरल्याने थेट वाहतूक सेवा सुरू झाली आहे. यादरम्यान मगर दिसून आली असून तालुका वनविभागाचे झोनल अधिकारी राकेश अर्जुनवाड यांनी नदीच्या बॅकवॉटरमध्ये सापळा रचून मगरीला जेरबंद करण्यासाठी सर्व तयारी केली आहे.

शेतकऱ्यांनी आणि जनतेने मगरी दिसल्यास भीती बाळगू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. याठिकाणी वनविभागाचे अधिकारी तळ ठोकून आहेत. यावेळी आमदारांसोबत कृष्णा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर वाघमोडे, वसंत खोत, अण्णाप्पाखोत, राजू मोदणे, कुमार पाटील, नसीर मुल्ला, गुलबक्षी मुल्ला आदी उपस्थित होते.

Tags: