ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स आणि कर्नाटक स्टेट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे टॅक्स प्रॅक्टिशनर्स डे आयोजित करण्यात आला होता.

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स आणि कर्नाटक स्टेट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे म्हैसूरमध्ये टॅक्स प्रॅक्टिशनर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सचे अध्यक्ष नारायण जैन यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सीए . बद्रीनाथ, सीए सचिन पाटील यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात जीएसटी कायदा आणि आयकर कायद्यात आणलेल्या बदलांवर मार्गदर्शन केले.

यावेळी बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जितेश कब्बूर, झोनल उपाध्यक्ष महांतेश दडीगुंडी, सचिन कुलकर्णी, संजय बडगंडी, विनायक चिनाणीकर आदी सदस्यांचा सहभाग होता.


Recent Comments