Gokak

लोळसूरजवळ नवीन पुलाचे काम लवकरच

Share

गोकाक येथे , घटप्रभा नदीच्या पाणीपातळीत वाढीमुळे गोकाकची जनता हादरली आह . आज सकाळी सार्वजनिक बांधकाम विभाग व बेळगाव जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी लोळसूर पुलासह शहरातील अनेक पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली.

त्यांनी शहरातील मटण मार्केट , कुंभार गल्ली व जुना गुरांचा बाजार या भागात पुरामुळे झालेल्या दुरावस्थेची माहिती घेतली व शहराच्या बाहेरील लोळसूर पुलाच्या दुरावस्थेचा आढावा घेतला.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, लोळसूजवळ नवीन पूल बांधण्यासाठी मंजुरी मिळाली असून, लवकरच आम्ही अंदाज बांधून निविदा मागवू. मात्र नवीन पूल बांधण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोळसूर पूल पाण्याखाली गेल्याने विद्यार्थी व नागरिकांना त्रास होत आहे. आता पाण्याची पातळी खालावली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी लवकरच लोळसूर पुलाची तपासणी करून तात्पुरती बससेवा सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नव्याने बांधलेल्या गोकाक-सिंगळापुर पुलाची पाहणी केली तसेच गोकाक शहराच्या बाहेर मार्कंडेय नदीशेजारी असलेल्या योगीकोळ्ळ या पर्यटन स्थळालाही भेट दिली.

पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सकाळी लवकरच आलेले जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांना पाहून गोकाक शहरवासीयांना आनंद झाला आणि त्यांनी आपल्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. त्याचवेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी लोकांच्या विनंतीला प्रतिसाद देत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. पुरामुळे घाबरू नका असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले.

Tags: