महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, राज्यात इंग्रजी आणि कन्नड भाषेतील सुमारे 18 हजार सरकारी मॉंटेसरी सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे.
व्हॉइस ओव्हर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कुवेंपू नगर येथील , मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यालयात जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत , महिला व बालकल्याण विभाग, बाल विकास योजना अंतर्गत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील अंगणवाडीतील कर्मचारी व सहाय्यकांना नियुक्ती आदेश पत्रांचे वाटप करण्यात आले.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भरती आदेशाच्या प्रती वितरित करण्याच्या कार्यक्रमात बोलताना स्पर्धेच्या युगात सरकारी मॉंटेसरी शाळेला हजारोंचा निधी देणार आहे. मात्र कर्नाटक सरकार मुलांना एकही पैसा न देता दर्जेदार पोषण आहार देऊन त्यांना बळ देण्याचे काम करत आहे, अंगणवाड्या बदलल्या जात आहेत. 18 हजार Lkg UKG सरकारी मॉन्टेसरी सुरु करण्याचा विचार केला जात आहे. यातील 300 एलकेजी ग्रामीण मतदारसंघात सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


1974 मध्ये इंदिरा गांधी यांनी सुरु केलेल्या अंगणवाडीचा पुढील वर्षी अमृत महोत्सव साजरा करण्यात येईल . असे त्या म्हणाल्या .
मी ज्या विभागात मंत्री आहे, त्या विभागात माझ्या ग्रामीण मतदारसंघातील सुमारे 50 अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासन आदेश पत्रांचे वाटप केले आहे, याचा मला अभिमान आहे.
नव्याने नियुक्ती झालेल्या अंगणवाडी सेविकांनी इन न्यूजशी बोलताना सांगितले की, एमबीए पूर्ण केल्यानंतर लहानापासून मोठ्या पदावर सरकारी नोकरी मिळवण्याचे त्यांचे स्वप्न असून, मुलांना सांभाळताना त्यांना खूप आनंद होत आहे.
अंगणवाडी मदतनीस म्हणाल्या की, माझ्या पतीचे निधन होऊन एक वर्ष झाले, मला एक मुलगा आहे, त्यामुळे मी नोकरीच्या शोधात आहे, आता लक्ष्मी हेब्बाळकरांच्या आशीर्वादाने मला नोकरी मिळाल्याचा आनंद आहे.


Recent Comments