hubali

हुबळी धारवाड पोलिसांनी घेतली राऊडी शिटर्सची परेड

Share

हुबळी येथील शासकीय विश्रामधाम येथे राउडीशीटर्सची परेड घेण्यात आली. अलीकडेच व्हिडीओ वायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर हुबळी धारवाड पोलिसांनी राऊडी शिटर्सना बोलावून त्यांना ताकीद दिली.

हुबळी धारवाड पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांच्या नेतृत्वाखाली हि परेड आयोजिण्यात आली होती. सोशल मीडियावर काही व्हिडीओ वायरल केल्याप्रकरणी १० राउडीशीटर्सना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. यावेळी कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचे आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला.

Tags: