सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोकाक शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आमदार रमेश जारकीहोळी यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून , नदीचे पाणी रहिवासी भागात शिरले आहे . गोकाक शहराला जोडणारा लोळसुर पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई वाटप करण्याकडे शासन लक्ष देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.


Recent Comments