Belagavi

माजी विद्यार्थ्यांनी साध्य केलेले यश हे सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत : शिक्षण समन्वयक डॉ. प्रसन्न कुमार

Share

बेळगाव येथील राजा लखम गौडा विधी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करून चांगले यश संपादन केल्याचे मत शिक्षण समन्वयक डॉ. प्रसन्नकुमार यांनी मांडले.

बेळगावच्या राजा लखमगौडा विधी महाविद्यालयाच्या 2005 वर्षाच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तसेच गुरुवंदना कार्यक्रम पार पडला. आर.एल. लॉ कॉलेज च्य के.के. वेणुगोपाल सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या प्राध्यापकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे म्हणून एम.एस. बगली, प्राचार्य ए.एच. हवालदार, शिक्षण समन्वयक डॉ. डी. प्रसन्नकुमार, जी.एस. बजाज आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

बेळगाव येथील राजा लखमगौडा कायदा महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य केले असून चांगले यश प्राप्त केल्याचा आनंद आहे, जे नवीन विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे. माजी विद्यार्थ्यांची कामगिरी सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श असल्याचे शिक्षण समन्वयक डॉ. प्रसन्नकुमार यांनी मत मांडले.

शिक्षणासोबत शिस्त महत्त्वाची आहे. . माजी विद्यार्थी सिद्धार्थराजे सावंत व इतरांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, येथे शिकलेले विद्यार्थी आज यशस्वी व्यक्ती बनले आहेत कारण त्यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना जीवनातील शिस्त शिकवली आहे.

प्राध्यापिका चारुशीला गोसावी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. संदीप देसाई, डॉ.प्रीती देसाई, बी.जी. पाटील यांच्यासह सीपीआय गड्डेकर, सुनिल आस्की, सिद्धार्थराज सावंत, अमन नदाफ, मनीष जाधव आदी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

Tags: