म्हैस आपल्या रेडकासह चरण्यासाठी शेतात जात असताना शेतातील बोअरवेलला जोडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून म्हैस व तिचे रेडकू जागीच ठार झाल्याची घटना धारवाड तालुक्यातील मानगुंडी गावात घडली आहे.

ही गुरे धारवाड तालुक्यातील मानगुंडी गावातील शेतकरी मडीवाळप्पा यांची होती. म्हशी चरायला गेल्यावर बोअरवेलची मोटार सुरू करणाऱ्या बोर्डावरील विद्युत तारेला गुरांचा स्पर्श झाला. त्यामुळे दोन्ही गुरे जागीच ठार झाली. ही घटना धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Recent Comments