Belagavi

वडगावात रात्री उशिरा घराची भिंत कोसळली…!!!

Share

बेळगाव शहरात रात्री उशिरा मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत कोसळली.

बेळगाव शहरात मुसळधार पावसामुळे पुंडलिक आणि श्रीकांत दंडगल बंधूंच्या घराची भिंत काल रात्री उशिरा कोसळली. कुटुंबातील सदस्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे . . घरातील स्वयंपाकघरातील भांडी, अन्नपदार्थ आणि चीजवस्तू भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून मोठे नुकसान झाले आहे .

पावसामुळे मोलमजुरी नसलेल्या या कुटुंबाच्या डोक्यावरील छप्पर देखील आता कोसळले आहे . सरकारने या गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करून नवीन घर बांधून द्यावे , अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण बाबुरी यांनी केली आहे.

Tags: