नवलगुंद तालुक्यातील ब्याल्याळ गावात शनिवारी एका माकडाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला .

धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील ब्याल्याळ गावात शनिवारी एका माकडाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. सर्व गावकऱ्यांनी हिंदू परंपरेनुसार मृत माकडाची विशेष पूजा केली. त्यानंतर गावात पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली व सर्व ग्रामस्थांनी धार्मिक विधी करून अंत्यसंस्कार केले. गावातील सरकारी शाळेच्या शेजारी अंत्यसंस्कार करण्यात आला आणि त्याच ठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला.
Recent Comments