बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी , पायाला मार लागला असतानाही वॉकर घेऊन , कर्तव्याची जाणीव न विसरता बेळगाव तालुक्यातील वाघवडे लिंक रोड विकास कामाची पाहणी केली.

बेळगाव तालुक्यातील वाघवडे गावातील जोडरस्त्याच्या दुरावस्थेमुळे गावकऱ्यांना ये-जा करताना प्रचंड त्रास होत होता. याबाबतचे वृत्तही अनेक माध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. ग्रामस्थांची अडचण ओळखून दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने , स्वत:च्या 5 लाख रुपयांच्या अनुदानातून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे .

काल आमदार अभय पाटील यांच्या पायाला दुखापत झाली . तरीही कर्तव्याची जाणीव ठेवून , रस्ता दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते आज वॉकर घेऊन आले होते. हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्त्याचे काम सुरू झाल्याने वाघवडे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केला.


Recent Comments