Banglore

एससी/एसटी विकास परिषद बैठकीत अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांचे ताशेरे

Share

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती राज्य विकास परिषदेची बैठक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अनुदानाचा वापर करून विकास न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या बैठकीत दिला. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती राज्य विकास परिषदेची बैठक आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी मुख्यमंत्री बोलताना म्हणाले, संपूर्ण देशात SCSP/TSP म्हणजे अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजना कायदा आम्हीच लागू केला असून लोकसंख्येनुसार एससीएसटी समाजावर पैसे खर्च करणारे केवळ आमचेच सरकार आहे. २०२४-२५ या सालात ३९१२१.४६ कोटी रुपये अनुदान देण्यात आले होते त्यापैकी ३५२२१.८४ कोटी खर्च करण्यात आले आहेत. अनुदानात ९९.६४ कोटी खर्च करण्यात आले नाहीत. दिलेल्या अनुदानात १०० टक्के अनुदानाचा वापर करावा असे सांगत ज्या अधिकाऱ्यांनी अनुदानाचा गैरवापर केला आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, निष्काळजीपणाने वागणाऱ्या अधिकाऱ्यांची गय ठेवली जाणार नाही असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

या बैठकीस उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, समाजकल्याण मंत्री डॉ.एच.सी. महादेवप्पा, मंत्री एच.के.पाटील, प्रियांक खर्गे, डॉ. एम.सी. सुधाकर, आमदार प्रसाद अब्बय्या, बसंतप्पा, श्रीनिवास, नरेंद्रस्वामी, कृष्णनायक, विधान परिषद सदस्य प्रकाश राठोड, खासदार सुनील बोस आदी उपस्थित होते.

Tags: