Gokak

चोरी झालेले मोबाईल मूळ मालकांना परत : गोकाक पोलिसांची कामगिरी

Share

गोकाक शहर पोलिसांनी सीआयईआर पोर्टल तंत्रज्ञानाच्या मदतीने चोरीला गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेत ३९ मोबाईलचा पत्ता लावत सदर मोबाईल संच मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

गोकाक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेले 39 मोबाईल सीआयईआर पोर्टल तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधून काढण्यात आले आहेत. हे मोबाईल संच आज गोकाक सीपीआय गोपाल राठोड आणि पीएसआय आय के वाळेकर यांनी मूळ मालकांकडे सुपूर्द केले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे मोबाईल मालकातून समाधान व्यक्त करण्यात आले.

Tags: