Belagavi

ज्योती व भाऊराव काकतकर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Share

बेळगावमधील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती आणि भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

१९८० ते १९८५ या साली शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तसेच प्राध्यापकांचा सत्कार समारंभ बेळगावमधील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजिण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुन गावडे होते. सुजाता कदम यांच्या इशस्तवनाने आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने

कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिल्यानंतर विविध माजी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त करून महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला.

यावेळी आर एन हरगुडे,व्ही एच मिरची, एम टी जाधव, ए एस देसाई, अशोक घोरपडे, व्ही एन रंजनगी, बी बी भैरवपनवर माजी विद्यार्थिनी – विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या दळवी यांनी करून दिला. तर परेश शिंदे यांनी आभार मानले.

Tags: