RAIN

मुद्देबिहाळ तालुक्यात मुसळधार पाऊस :वीज पडून गुरे ठार

Share

 

विजयपूर जिल्ह्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला तर मुद्देबिहाळ तालुक्यात पावसाने सारेकाही विस्कळीत झाले.
मुद्देबिहाळ तालुक्यातील गोनाळ एस .गावात वीज पडून दोन गायींचा मृत्यू झाला. गावातील बसवराज पाटील व बसप्पा उप्पलदिन्नी यांच्या गायींचा मृत्यू झाला आहे. तसेच मुद्देबिहाळ तालुक्यातील अडवी हुलगबाळ गावात हणमंत कंबार या शेतकऱ्याची गाय वीज पडून ठार झाली.

मुद्देबिहाळ तालुक्यातील देऊर गावातील हणमंत अडियाल या शेतकऱ्याच्या म्हशीवर वीज कोसळली असून पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत.

Tags: