बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात दैवज्ञ ब्राह्मण समाजातर्फे बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.

देशात 07 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात दैवज्ञ ब्राह्मण समाजातर्फे मतदान जागृती करून बेळगावच्या शहापूर, शास्त्रीनगर, कपिलेश्वर कॉलनी, या भागात बाईक रॅली काढण्यात आली. होसूर, शहापूर, चन्नमा रोड, मंडोळी रोड आधी भागात मतदान जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीत 300 हून अधिक दैवज्ञ समाज बांधव सहभागी झाले होते.

येत्या 07 मे रोजी लोकसभा निवडणूक होत असून 07 मे रोजी 100 टक्के मतदान व्हावे, 07 मे रोजी सुट्टी असल्याने सर्वांनी घरी बसून किंवा प्रवासाला न जाता मतदान करावे, असे समाजाच्या प्रमुखांनी सांगितले .

रॅलीत 300 हून अधिक समाज बांधव सहभागी झाले होते. अध्यक्ष दयानंद नेतळकर सचिव मंजुनाथ शेट, कोषागार
भूषण रेवणकर, गणेश मळलीकर, प्रवीण रेवणकर, श्रीपाद रायकर, सुरेंद्र वेर्णेकर यांच्यासह समितीचे सर्व सदस्य सहभागी झाले होते.
दैवज्ञ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष नागेंद्र पळसकर, दैवज्ञ गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर ,
प्रभा अन्वेकर व सर्व दैवज्ञ महिला मंडळ ,दैवज्ञ सहकार बँकेचे अध्यक्ष सदानंद रेवणकर, दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष वैभव वेर्णेकर दैवज्ञ स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष जीवन वेर्णेकर व सर्व समिती सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments