विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लचयान गावात बोअरवेल मध्ये पडलेल्या सात्विक या २ वर्षीय बालकाला जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

SDRF, NDRF, अग्निशमन दल, पोलिस विभागाकडून सलग 20 तास अखंडपणे बचावकार्य सुरु होते . खाली डोके असलेल्या स्थितीत पडलेल्या सात्विकला वाचवण्यासाठी सर्वच पथके शर्थीचे प्रयत्न करीत होते . त्याला बोअरवेलच्या पाईपमधुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता . शिवाय एंडोस्कोप कॅमेऱ्याद्वारे त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात आली होती . तब्बल २० तासांच्या प्रयत्नानंतर सात्विकच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला .

त्यामुळे बचाव पथकाचा उत्साह आणखी वाढला आणि त्यांनी आपल्या कामाचा वेग वाढवला . अखेर सात्विकला त्या बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले . त्यावेळी त्या ठिकाणी तैनात असलेल्या डॉक्टरांच्या पथकाने मुलाला उचलून घटनास्थळी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून तालुका रुग्णालयात नेले.
बुधवारी संध्याकाळी 6 वाजता बालक बोअरहोलमध्ये पडल्याचे समजताच बचावकार्य सुरू करण्यात आले. बचाव कार्यात अडथळा ठरणारे खडक फोडून , बचाव पथक आज सकाळी त्या मुलापर्यंत पोचले . शेवटी बोअरहोल पाईप कापून मुलाला उचलण्यात आले. आपला मुलगा सुखरूप असेल कि नाही या चिंतेत असलेल्या मुलाच्या पालकांनी आणि गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.


Recent Comments