जागतिक महिला दिनानिमित्त बेळगावात डिजिटल कॉमन सर्विस सेंटरच्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतो. या दिवसाचे औचित्य साधून औचित्य साधून बेळगाव डिजिटल कॉमन सर्विस सेंटर असोसिएशनतर्फे दिनांक 8 मार्च 2024 रोजी महिला दिन साजरा करण्यात आला.

शुक्रवारी सकाळी निपाणी येथील दिपाली गणेश घोडके, तर पांगीरे गावातून सुनीता पवन नरे तसेच चिकोडीतील समीना डोंगरकडे या कर्तृत्ववान महिलांचा डिजिटल कॉमन सर्विस सेंटर असोसिएशनचे अध्यक्ष राम भदरगडे व जनरल सेक्रेटरी सुनील जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला दिनाच्या शुभेच्छा देवून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.


यावेळी राम भदरगडे, सुनील जाधव व समीउल्ला यांनी सर्व महिला कर्मचारी व पदाधिकारी यांना महिला दिनांच्या शुभेच्छा देवून त्यांची लाभणारी साथ अनमोल असल्याचे सांगितले. डी एम. मालिकार्जुन यांनी कॉमन सर्विस सेंटरच्या महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच समीउल्ला, आणासाहेब पाटील, अमन माने, विवेकानंद स्वामी, सचिन मंगावते, शंकर पाटील, सागर मगदूम यानी मनोगत व्यक्त केले.


Recent Comments