Belagavi

कडोलीत श्री यल्लम्मा-रेणुका देवीची मारग मळणे जत्रा

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली येथील आमराईतील श्री लक्ष्मी देवीच्या गदगीजवळ श्री यल्लम्मा-रेणुका देवीची मारग मळणे जत्रा उदो गं आई उदोच्या जयघोषात श्रद्धा-भक्तीभावाने पार पडली.

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त कडोली गावातील श्री रेणुकादेविचे हजारो भाविक सालाबादाप्रमाणे सौदत्ती यल्लाम्मा डोंगराला जाऊन आल्यानंतर आमराईत श्री लक्ष्मी देवीच्या गदगीजवळ श्री यल्लम्मा-रेणुका देवीची मार्ग मळणे जत्रा साजरी करण्यात आली. देवस्थान
पंच कमिटी, ग्राम पंचायत सदस्य, हक्कदार, पुजारी व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थित सामुहिक पडल्या भरणे व पारंपारिक धार्मिक विधी करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाने जत्रेची सांगता झाली.

तत्पूर्वी ग्राम पंचायत कमिटीतर्फे परिसराची स्वच्छता,पाण्याची सोय व विद्युत दिव्यासह अत्यंत उत्तम नियोजन केले होते. ग्रा. पं.अध्यक्ष सागर पाटील व सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देवस्थान हक्कदार कमिटी, देवस्थानी पंच कमिटी व भाविक भक्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुजारी व हक्कदारांना आहेर करण्यात आला. मुकुंद बायनाईक यांनी आरती केली. देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष धनंजय कटांबळे यांनी मार्गदर्शन केले.


मारग मळणे जत्रेनिमित्त कडोली व परिसरातील भाविकांनी शिस्तबद्धरीत्या देवीचे दर्शन घेतले. आमराईत विविध खेळण्यांची दुकाने, मनोरंजनाच्या साधने, पाळणे, झोपाळे मांडण्यात आले होते. फ्लो

Tags: