वार्ड क्रमांक 33 मधील रामनगर येथील उपमहापौर सौ. रेश्मा प्रवीण पाटील यांनी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी रामनगर पहिला, दुसरा व तिसरा क्रॉसची पाहणी केली.

बेळगाव महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्र. 33 मध्ये येणाऱ्या रामनगर येथील पहिला, दुसरा व तिसरा क्रॉसची उपमहापौर सौ. रेश्मा प्रवीण पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या व त्या लवकर सोडविण्याची ग्वाही दिली.

या भागातील गटारी व रोडची कामे व्यवस्थित आणि दर्जेदारपणे करून लवकर पूर्ण करावी असे निर्देश संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिले. यावेळी तेथील नागरिकांनी उपमहापौरांचे स्वागत करुन आभार व्यक्त केले.


Recent Comments