Belagavi

बेळगावात रोटरी क्लब मिडटाऊनचा पुरस्कार सोहळा

Share

विद्यार्थ्यांमध्ये नेहमी उत्साह आणि शिकण्याची प्रेरणा असावी. अपयशामुळे आपले मनोबल ढासळू देऊ नका, असे आवाहन निवृत्त प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी केले.

ते गुरुवारी येथे बेळगाव मिड टाऊन रोटरी क्लबच्या वतीनं 2023-24च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

शिक्षणाला पूरक असे प्रशिक्षण आणि संसाधनांची कमतरता नाही. त्यांचा वापर करून तुमचे कर्तृत्व शोधा. या रोटरी क्लबची समाजसेवा अत्यंत प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले. निवृत्त प्राचार्य उदयसिंह राजपूत यांनी पुरस्कृत केलेला रोख पाच हजारांचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार व प्रमाणपत्र केएलई इंटरनॅशनल स्कूलच्या शरदी हेगडे हिने, महिला विद्यालयाच्या लावण्या सांबरेकरने द्वितीय पारितोषिक पटकावले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ठळकवाडी हायस्कूलच्या विशाल शहापूरकर व मिलिटरी स्कूलच्या प्रभा पांडे यांनी पटकावले. सर्वांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

मनोहर जाधव यांनी संस्थेच्या सेवा क्षेत्राविषयी सांगितले. रोटरीचे अध्यक्ष सतीश नाईक यांनी संस्थेने वाढवलेल्या आणि दिलेल्या सेवेबद्दल सांगितले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी व पालकांचे प्राचार्य प्रा. उदयसिंग राजपूत यांनी आभार मानले.
सचिव गुलाबचंद चौगुले, सतीश मिठारे, विजय पालार, एल. व्ही. देसाई, नागेश मोरे, सुभाष कत्ती, अशोक मळगली, पालक, विद्यार्थी व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: