भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचा वापर करत असल्याचा आरोप दलित संघर्ष समिती आंबेडकर वादचे नेते मौली शंकर यांनी केला.

बेळगावात आज गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दलित नेते मौली शंकर म्हणाले की, देशात गरिबीची समस्या वाढली आहे, जागतिक भूक निर्देशांकात देश 111 व्या क्रमांकावर आहे. आरोग्य क्षेत्रातही भारत मागे असल्याची वस्तुस्थिती आहे. ठराविक भांडवलदार गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.

2024 ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची ही राजकीय रणनीती आहे, राममंदिराच्या कार्यक्रमामागे कोणताही राजकीय हेतू नसेल तर पंतप्रधान आणि भाजप नेत्यांनी राममंदिराच्या उद्घाटनासाठी घाई का केली असावी? असा सवाल त्यांनी केला. ही सारी नाटके बंद करा अशी मागणी त्यांनी केली.
राम मंदिराऐवजी संविधान मंदिर बांधले पाहिजे, हे देशातील नागरिकांनी समजून घेतले पाहिजे, तसेच भारताच्या प्रथम नागरिकाला संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमंत्रित केले पाहिजे, असे ते म्हणाले.


Recent Comments