विजयपुर शहरातील सिद्धेश्वर मंदिरासमोर झारखंडचे काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात जिल्हा भाजपच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

खासदार साहू यांच्या घरात लाखो कोटींची रोकड सापडली. आंदोलकांनी साहू यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. तसेच खासदार साहू यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी खासदार साहू तसेच काँग्रेसवर संताप व्यक्त करण्यात आला . यावेळी भाजप नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.



Recent Comments