बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नजीकच्या काळात विशेष योजना आणली जाईल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील आंबेवाडी गावात आज, रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी कॉलम पूजन केल्यानंतर त्या बोलत होत्या. माझ्या आमदारकीच्या काळात मी मतदारसंघासाठी 1800 कोटी रुपये आणले आणि विकासकामे केली. येथील मूलभूत गरजा

पूर्ण करण्यासाठी मी 5 वर्षे सतत काम केले आहे. मध्यंतरी कोरोना आणि पुरामुळे काही किरकोळ अडचणी आल्या. पण विकास थांबला नाही. त्यामुळेच गेल्या निवडणुकीत तुम्ही मला मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी विजयी केले. यामुळे मला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा दिली. विकासकामांच्या माध्यमातून तुमचे ऋण फेडणार असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते युवराज कदम, शिवाजीराव अतिवाडकर, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, ग्रापं. अध्यक्षा लक्ष्मी येळ्ळूरकर, मधुरा तेरसे, सुरेशराव रेडेकर, किशोर काकडे, संजय तरळे, अमोल भातकांडे, भाऊ तुडवेकर, राजू कोचरे, संगिता आंबेकर, नागेश तरळे, अगसगेकर सर, अनंत तुडवेकर, यल्लाप्पा चिखलकर, बाळकृष्ण तेरसे, मनोहर बेळगावकर, रवींद्र तरळे, यल्लाप्पा लोहार, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.


Recent Comments