फेलिसिटी कंपनीतर्फे बेळगावात गरिबांसाठी सुसज्ज, स्वप्नातील घरे बांधली जात आहेत. सर्वांना परवडतील अशा माफक किमतीत ती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे असे जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी काकतीजवळील बर्डे ढाब्याजवळ बेंगळूरस्थित फेलिसिटी ऍडोब एलएलपी कंपनीच्या ‘स्वर्ण गृह’ या दुसऱ्या टप्प्यातील गृहप्रकल्पाला आणि फ्लॅट्सच्या बुकिंगला शुक्रवारी सायंकाळी शानदार समारंभात चालना दिली. फेलिसिटी कंपनीचे संस्थापक प्रणव शर्मा यांनी कमी खर्चात घरे बांधून लोकांची इच्छा पूर्ण केली आहे, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी ‘स्वर्ण गृह’च्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. कोलार आणि तुमकूर जिल्ह्यातील लोकांसाठी त्यांनी यशस्वीरित्या सुवर्ण घरे बांधली आहेत. या घरांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

काकतीसारख्या ग्रामीण भागात फेलिसिटीने गृहप्रकल्प राबवून ग्रामीण भागाचा विकास सुरु केला आहे. या भागात औद्योगिक वसाहत आणि अन्य उद्योगधंदे असल्याने येथील लोकांना कमी दरात घरे मिळणार असल्याने त्यांच्यासाठी ही एक पर्वणी असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. एकस कंपनीमुळेही या भागात अनेकांना रोजगार, निवारा मिळाला आहे. जनतेच्या आशिर्वादाने राज्यात सिद्धरामय्या सरकार सत्तेत आले आहे. या भागात अधिकाधिक तांत्रिकदृष्ट्या प्रगत कंपन्या आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.
सुसज्ज बांधकामासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन शर्मा यांना दिले. त्यांनी या प्रदेशातील लोकांसाठी सावली बनून धोरण अधिक चांगल्या प्रकारे निवासी प्रकल्प विकसित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
फेलिसिटीचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक प्रणव शर्मा म्हणाले की, आमच्या कंपनीने तुमकूरमध्ये 2 प्रकल्प आणि कोलारमध्ये एक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. बेळगावातील हा चौथा प्रकल्प आहे. बेळगावच्या जनतेला नेहमीच परवडणाऱ्या बजेटमध्ये आम्ही घरे उपलब्ध करून दिली आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी फेलिसिटी कंपनीचे संचालक शिव पाटील, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे, माजी सदस्य सिद्धू सुनगार, महांतेश मगदुम, किरण रजपूत आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना व्हीडिओच्या माध्यमातून स्वर्णगृह निवासी प्रकल्पाची माहिती देण्यात आली.


Recent Comments