Belagavi

मधुमेह दिनानिमित्त जनजागृती रॅली

Share

देशातील जनतेचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून अनेक पद्धतीच्या जनजागृत्या केल्या जातात, अशाच पद्धतीने बेळगाव के एल इ होमोपॅथिक मेडिकल कॉलेज , नर्सिंग कॉलेज, व के एल इ सेंटनरी चॅरिटेबल हॉस्पिटल व क्लिनिक यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली मधुमेह दिनाचे औचित साधून जनजागृती रॅली काढण्यात आली,

नाथ पै,सर्कल शहापूर ते येळ्ळूर रोडवरील , केएलई चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल पर्यंत ही जनजागृती रॅली काढण्यात आली , देशातील जनता साखरेचे सेवन अधिक करत आहे ,प्रत्येक पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक झाल्यामुळे मधुमेह सारख्या रोगाला सामोरे जावे लागत आहे, मधुमेह होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी याबद्दल जागृती करणे गरजेचे आहे असे सेन्टेनरी चॅरिटेबल हॉस्पिटल क्लीनिकचे संचालक डॉक्टर एस सी धारवाड यांनी बोलताना सांगितले

यावेळी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे संचालक एम ए उडचणकर व नर्सिंग कॉलेज प्रिन्सिपल डॉक्टर विक्रम नेसरी यावेळी उपस्थित होते . कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या जनजागृती रॅलीमध्ये भाग घेत मधुमेहाबद्दल जनजागृती केले

Tags: