Belagavi

बेळगाव महापालिकेतर्फे ओबव्वा जयंती साजरी

Share

बेळगाव महापालिकेतर्फे आज ओबव्वा जयंती साजरी करण्यात आली.

बेळगाव महानगर पालिकेतर्फे आज मनपा सभागृहात ओबव्वा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापौर शोभा सोमनाचे यांनी ओबव्वा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सत्ताधारी गटाचे नगरसेवक ऍड. हणमंत कोंगाळी यांनी ओबव्वा यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.

कार्यक्रमाला उपमहापौर रेश्मा पाटील, सत्ताधारी गटनेते राजशेखर डोनी, नगरसेवक गिरीश धोंगडी, संदीप जिरग्याळ व अन्य नगरसेवक तसेच पालिका उपायुक्त उदयकुमार व मनपा कर्मचारी उपस्थित होते.

Tags: