गोकाक तालुक्यातील कोन्नूर शहरात नवरात्री महानवमी उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आदीजांबव समाजातर्फे श्री दुर्गादेवी मंदिरात दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

दुपारी शेकडो सुवासिनींच्या सहभागाने दुर्गादेवीच्या मंदिरात आरती करून कोन्नूर सीमेवर जाऊन मूर्तीला अभिषेक करण्यात आला. देवीच्या मूर्तीची पूजा करून विविध वाद्यांसह भव्य मिरवणूक काढून श्री दुर्गादेवी मंदिरात जाऊन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी समाजाचे नेते, युवक व शेकडो महिला या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
यावेळी सुवासिनी आणि स्थानिक भाविकांनी देवीच्या मूर्तीला नैवेद्य दाखवून दर्शन घेतले. आदीजाम्बव समाजातर्फे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी व्यंकटेश केळगेरी, धन्यकुमार मेगेरी, विठ्ठल गुडाज, मनोहर लगमगोळ, सदानंद शिंग्यागोळ, सुरेश नडगेरी, मयुरा गुडाज, केम्पण्णा नडगेरी आदी उपस्थित होते.


Recent Comments