बेळगावला हाॅकीची मोठी परंपरा असून राज्यस्तरीय म्हैसूर दसरा मुख्यमंत्री चषक हाॅकी स्पर्धेत बेळगावच्या महिला संघाने कौशल्य पणाला लावून सामना जिंकून बेळगावचा नावलौकिक वाढवावा अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या.

राज्यस्तरीय म्हैसूर दसरा मुख्यमंत्री चषक हाॅकी स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा महिला हॉकी संघाला शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाला. त्याप्रसंगी पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, बेळगावात एस्ट्रोटर्फ हॉकी मैदानाची मागणी प्रशासनातर्फे लवकरच रामतीर्थ नगर येथे पूर्णत्वास येईल. यामुळे पुन्हा एकदा बेळगाव मधून दर्जेदार हाॅकी खेळाडू निर्माण होण्यास मदत
प्रकाश कालकुंद्रीकर यांनी ‘हॉकी बेळगाव’ची माहिती देऊन प्रास्ताविक केले. दत्तात्रय जाधव यांनी स्वागत केले. अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यांनी प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन खात्याचे अधिकारी श्रीनिवास, डॉ. अनिल पाटील, सौ मीना अनिल बेनके उपस्थित होते.
कर्नाटक शासनाच्या युवजन व क्रीडा खात्यातर्फे दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 16 ते 21आक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धेसाठी हाॅकी बेळगाव मुलींच्या संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये श्रेया रुतकुटे, प्राजक्ता निलजकर, धनश्री शिंदे, नागेश्वरी धामणेकर, भावना किलर्गी, मृणाली भाते, विजयालक्ष्मी मुलिमनी, दर्शना रुकजे, भूमी कुगजी, श्रेया मोहिते, रेणुका मुडनगौडा, ईशा गवळी, ऐश्वर्या देसाई, श्रुती येळ्ळूरकर, मुस्कान कित्तूर, संघ व्यवस्थापक सुधाकर चाळके आदी शनिवार दि. 14 आक्टोबर रोजी सायंकाळी म्हैसूरला रवाना होणार आहेत.
यावेळी उपाध्यक्ष पूजा जाधव, विनोद पाटील, मनोहर पाटील, आशा होसमणी, अश्विनी बस्तवाडकर, नामदेव सावंत, श्रीकांत आजगावकर, गणपत गावडे, संजय शिंदे, उत्तम शिंदे, निखिल शिंदे, विजय उपाध्ये, वेंकटेश महारेड्डी आदी उपस्थित होते.


Recent Comments