Belagavi

॥ उद्यमबाग येथे कलाश्री को ऑप सोसायटीचे उद्घाटन ॥

Share

बेळगांव – ब्रम्हनगर उद्यमबाग येथील कलाश्री उद्योग समुहाच्या वतिने कलाश्री को ऑप सोसायटी ची स्थापना करून त्याचे मान्यवरांच्या हस्ते ग्राहकांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले .
कलाश्री टॉवरच्या इमारतीत झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी संचालिका सुकन्या डोळेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले त्यानंतर संस्थापक अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून सोसायटी

कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी सोसायटीतील आकर्षक योजनांची माहिती देतांना मिळणारे व्याजदर तसेच कलाश्री एफ डी योजनेत भाग घेतलेल्या सुरवातीच्या सभासदांचा लकी ड्रा काढला जाणार असून भाग्यवान पाच विजेत्यांना 10 ग्रॅम सोने , 500 ग्रॅम चांदी , 43 इंच रंगीत टीव्ही , कॉर्नर सोफा सेट व रोख रुपये 25000/ ( हजार ) अशी बक्षिसे

असल्याचे सांगितले तर संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांनी मनोगत व्यक्त करतांना ही सोसायटी ग्राहकांचे हित जोपासणार असून गरजू सभासदांना त्यांच्या अत्यावशक कामासाठी , गरजेच्या वस्तू खरेदीसाठी माफक दराने कर्जपुरवठा करून त्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी कटीबद्ध असणार आहे असे सांगितले .

यावेळी वरील मान्यवरांसह किरण होसमणी , रणजित रेडेकर , प्रकाश डोळेकर प्रमोद डोळेकर चेतन पाटील , रश्मीता यादव , स्वाती कुरणे , लक्ष्मण दलवाई यांचेसह संचालक ,सभासद, हितचिंतक कलाश्री उदयोग समुहातील कर्मचारी उपस्थित होते .

Tags: