Belagavi

गणेशोत्सवासाठी यशवंतपूर-बेळगाव दरम्यान विशेष रेल्वे सेवा

Share

गणेश चतुर्थीनिमित्त दोन दिवस यशवंतपूर ते बेळगाव आणि बेळगाव ते यशवंतपूर अशी विशेष रेल्वे धावणार असल्याचे राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी यांनी सांगितले.

याबाबत खासदार इरण्णा कडाडी यांनी शनिवारी (९ सप्टेंबर) प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यशवंतपूर-बेळगाव गाडी (07389) 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:15 वाजता यशवंतपूर स्थानकावरून सुटेल आणि 16 सप्टेंबर रोजी बेळगाव येथे सकाळी 6 वाजता पोहोचेल.

तसेच बेळगाव-यशवंतपूर गाडी (07390) बेळगावहून 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुटेल आणि 17 रोजी पहाटे 04:30 वाजता यशवंतपूर स्थानकावर पोहोचेल, असे त्यांनी सांगितले.
यशवंतपूर-बेळगाव गाडी (07391) 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:15 वाजता यशवंतपूर स्थानकावरून सुटेल आणि 18 रोजी सकाळी 6 वाजता बेळगाव स्थानकावर पोहोचेल.

तसेच बेळगाव-यशवंतपूर गाडी (07392) बेळगावहून 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुटेल आणि 19 सप्टेंबर रोजी पहाटे 04:30 वाजता यशवंतपूर स्थानकात पोहोचेल. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा. इरण्णा कडाडी यांनी केले.

यासंदर्भातील विनंतीला प्रतिसाद देत जलद ट्रेनची व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचे आभार मानले आहेत.

Tags: